केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाटस ते जत रस्ते विकासासाठी 10.37 को.रू.निधीची मंजुरी
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील रस्ते विकासासाठी केंद्रीय स्तरावर केलेल्या मागणीला यश
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाटस ते जत रस्ते विकासासाठी 10.37 को.रू.निधीची मंजुरी
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील रस्ते विकासासाठी केंद्रीय स्तरावर केलेल्या मागणीला यश
इंदापूर : प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्तेबांधणीच्या बळकटीकरणासाठी पाटस- बारामती- इंदापूर- अकलूज- सांगोला -जत(NH965G) या रस्त्यांच्या पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 10.37 कोटी रुपये खर्च मंजूर दिली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली असून इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी सततचा पाठपुरावा केल्याने त्यांच्या मागणीला यश आले आहे.
इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचा मानला गेलेला राज्य महामार्ग बारामती ते इंदापूर -अकलूज हा रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने व वाहतूक दळणवळण सुव्यवस्थित व्हावे,अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रस्ते विकासासाठी केंद्रीय स्तरावर तसेच मंत्री नितिन गडकरी यांचे भेट घेऊन याविषयी सततचा पाठपुरावा केला होता. आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्तेबांधणीच्या बळकटीकरणासाठी पाटस- बारामती- इंदापूर- अकलूज- सांगोला -जत(NH965G) या रस्त्यांच्या पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 10.37 कोटी रुपये खर्च मंजूर दिली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली.
इंदापूर तालुक्यातील रस्ते विकासाला यामुळे गती मिळणार असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.