मुंबई

राज्यात लॉकडाऊन निर्णय  निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस? ; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय

राज्यात लॉकडाऊन निर्णय निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस? ; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय

मुंबई : बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. 8 दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

‘आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना मदत द्या’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

काँग्रेस नेत्यांची भूमिका काय?

राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा. वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा, असंही पटोले यांनी म्हटलंय. राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तरत कोरोनाची साखळी तुटेल. गुजरातमधून रेमडेसिव्हीरचा साठा मिळू शकला तर पाहावा. देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित आहेत. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

तर राज्यात आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरीबांचं नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरुही नको, मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

सर्वांचं ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आमचं सहकार्य असेल. पण, राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश करू नये. एक आठवड्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्यातून वगळण्यात यावे. निर्णय लागू करू नये. स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ, असं पवार म्हणाले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरचं मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झालं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!