राजकीय

सोलापूरच्या नियोजित पाण्याचा एक थेंबही घेतला नाही पाणी घेतल्याचं सिद्ध झाल्यास राजकीय सन्यास घेईन : दत्तात्रय भरणे

सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप

सोलापूरच्या नियोजित पाण्याचा एक थेंबही घेतला नाही पाणी घेतल्याचं सिद्ध झाल्यास राजकीय सन्यास घेईन : दत्तात्रय भरणे

सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

उजनी धरणातील सोलापूर शहर जिल्ह्याचे नियोजित एक थेंब पण पाणी पालकमंत्री म्हणून घेतले असल्याचं सिद्ध केल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेऊन गेल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केलाय.

सोलापूरच्या नियोजित पाण्याचा एक थेंबही घेतला नाही

सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हेतर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले. जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही, दत्तात्रय भरणे म्हणाले.

माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकरी हिरावणार नाही

उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असलं तर राजकीय सन्यास घेईन. उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप केला जातोय, मात्र, माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, अशा भावना दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केल्या. पालकमंत्री दत्तात्रय भरणे मागच्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेत आहेत.

प्रणिती शिंदेंना पालकमंत्री करा, भाजप नगरसेवकांची मागणी

काळे कपडे परिधान करून येणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखले. सोलापूर जिल्ह्याचे 900 रेमडेसिव्हीर इजेंक्शन इंदापूरला पालकमत्र्यंनी नेल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेधही केला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे दाखल झाले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. भाजपा नगरसेवक सुरेश पाटलांना पोलिसांनी त्यांतर ताब्यात घेतलं. सोलापूरचं पाणी पळवल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी निषेध व्यक्त केला.

Related Articles

Back to top button