इंदापूर

उसाच्या फडात गांज्याची लागवड ; पोलिसांची कारवाई

संबंधितांवर गुन्हे दाखल

उसाच्या फडात गांज्याची लागवड ; पोलिसांची कारवाई

संबंधितांवर गुन्हे दाखल

बारामती वार्तापत्र

माणूस पैसा कमावण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करताना दिसून येतोय त्यामुळे अवैद्य धंद्यांना पीत फुटताना दिसून येतेय आता तर चक्क ऊसाच्या फडातचं गांज्याची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार खोरोची गावात उघड झाला आहे. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून याचा पर्दाफाश केला आहे.

इंदापूर तालुक्यातील खोरोची गावा जवळ असलेल्या साखरे वस्ती येथील गट नंबर ४४८ मध्ये उसाच्या पिकांमध्ये राज्य शासनाने बंदी घातलेल्या गांजा पिकाची लागवड केल्याचे उघड झाले असून संबंधित व्यक्तीवर एनडीपीएस अॅक्ट २० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे खोरोची गावच्या हद्दीमध्ये असलेल्या साखरे वस्ती जवळील गट नंबर ४४८ मधील ऊस पिकामध्ये सदर पिक मालक संतोष विठ्ठल साखरे यांनी राज्य शासनाने बंदी घातलेल्या गांजा या पिकाची लागवड केल्याचे माहिती पोलिसांना मिळताच दिनांक २८ जून रोजी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये साधारणपणे २७ किलो वजनाची साडेसहा ते सात फूट उंची असलेली दोन झाडे मिळा आहेत. पोलिसांनी 1 लाख 8 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Related Articles

Back to top button