सामाजिक बांधिलकीतून कोवीड सेंटरला जाधव कुटुंबीयांकडून पाच सिलिंग फॅन ची भेट
लाखो लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे

सामाजिक बांधिलकीतून कोवीड सेंटरला जाधव कुटुंबीयांकडून पाच सिलिंग फॅन ची भेट
लाखो लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे
निलेश भोंग प्रतिनिधी
निमगाव केतकी येथील श्री. मोबाईल शॉपी चे मालक सुहास जाधव यांनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून निमगाव केतकी येथील कोविड सेंटरला फॅन देऊन मदत केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग मेटाकुटीला आलेला असताना निमगाव केतकी येथील सुहास जाधव व त्यांचे सासरे गणपत राऊत यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
संपूर्ण जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ने अक्षरश: थैमान घातले असून लाखो लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना ची दुसरी लाट संपतेच असे वाटण्याच्या वेळीच तिसरी लाट येणार असल्याचे भाकित करण्यात येत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या कोरोना ग्रस्त रुग्णांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून सुहास जाधव व गणपत राऊत यांनी अशा प्रकारचे मदत केली आहे.
यावेळी सुहास जाधव, गणपत राऊत, डॉ. मिलिंद खाडे, गणेश घाडगे, नितीन आदलिंग, गणेश शेळके, आदेश रासकर व निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.