इंदापूर

ऋषिकेश शिंदे यांचा प्रामाणिकपणा व भिगवण पोलिसांच्या तत्परतेने एटीएम मशीन मध्ये राहिलेली रोख रक्कम संबंधित व्यक्तीस परत

प्रामाणिक शिंदेसह पोलिसांचे परिसरातून तोंडभरून कौतुक

ऋषिकेश शिंदे यांचा प्रामाणिकपणा व भिगवण पोलिसांच्या तत्परतेने एटीएम मशीन मध्ये राहिलेली रोख रक्कम संबंधित व्यक्तीस परत

प्रामाणिक शिंदेसह पोलिसांचे परिसरातून तोंडभरून कौतुक

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील मौजे भादलवाडी गावच्या हद्दीतील बिल्ट कंपनीच्या एटीएम मशीन मध्ये अज्ञात व्यक्तीची नजर चुकीने राहिलेली ५० हजार रोख रक्कम ही ऋषिकेश शिंदे व भिगवन पोलिसांच्या तत्परतेने संबंधित व्यक्तीस परत मिळाली.

सविस्तर हकीकत अशी की,बुधवारी (दि.२१) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मौजे भादलवाडी गावच्या हद्दीतील बिल्ट कंपनीच्या एटीएम मशीन मध्ये अज्ञात व्यक्तीची राहिलेली ५० हजार रोख रक्कम ही तेथेच नजर चुकीने एटीएम मशीनच्यावर राहिलेली होती. काही वेळानंतर ऋषिकेश ज्ञानदेव शिंदे रा. भिगवण हे पैसे काढण्यासाठी सदरील एटीएम सेंटर मध्ये गेले असता त्यांना सदर प्रकार लक्षात आला व त्यांनी तात्काळ भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने, पो. हवालदार वारगड, पो. कॉ. उगले, श्री माने यांना सदरील प्रकाराबाबत सांगितले असता तात्काळ महेश उगले व अंकुश माने यांनी सदर एटीएम सेंटर येथे जाऊन ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापक सुरज शिंदे व पवन पाटील यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून तसेच पैसे गहाळ झालेल्या व्यक्तीची ओळख पटवून सदरील पैसे हे दत्तात्रय मच्छिंद्र कदम रा. भादलवाडी यांचे असल्याचे निष्पन्न करून ताब्यात दिले.

त्यामुळे ऋषिकेश शिंदे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा व भिगवन पोलिसांनी तत्काळ घेतलेली दखल यामुळे भिगवण परिसरातून शिंदेसह पोलिसांचे तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button