अजितदादांची काम करण्याची पद्धतच निराळी ! भल्या पहाटे अधिकाऱ्यांची उडती भांबेरी !
कामे दर्जेदार व्हावीत यासाठी अधिक लक्ष देण्याबाबत निर्देश

अजितदादांची काम करण्याची पद्धतच निराळी ! भल्या पहाटे अधिकाऱ्यांची उडती भांबेरी !
कामे दर्जेदार व्हावीत यासाठी अधिक लक्ष देण्याबाबत निर्देश
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. बारामती शहरात सुरु असलेल्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय,कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नविन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नविन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.
बारामती शहर आणि परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. भल्या पहाटे अर्थात सहा वाजता ऑन फिल्ड आलेल्या अजितदादांनी विकासकामांबाबत अधिकारी वर्गाला सुचना करत कामे दर्जेदार व्हावीत यासाठी अधिक लक्ष देण्याबाबत निर्देश दिले.
विकासकामांवर बारकाईने लक्ष देऊन ती कामे अधिक दर्जेदार व्हावीत यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भर असतो. अजितदादा मुंबई-पुण्यात असोत की बारामतीत, सकाळी सहा वाजल्यापासून ऑन फिल्ड असतात. त्यामूळे साहजिकच अधिकारी वर्गाचीही भंबेरी उडालेली पाहायला मिळते. त्याचाच प्रत्यय आजही आला.
सकाळी ६ वाजता अजितदादांनी आपला दौरा सुरु केला. शहरात सुरु असलेल्या प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी बारकाईने पाहणी करत अधिकारी वर्गाला सुचना केल्या.
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गट नेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.