छोट्या पडद्यावरील ठाकूर सज्जन सिंह नावाने परिचीत असणारे अनुपम श्याम यांचे डायलिसीसमुळे निधन

डायलिसीसमुळे निधन. ते 63 वर्षांचे होते.

छोट्या पडद्यावरील ठाकूर सज्जन सिंह नावाने परिचीत असणारे अनुपम श्याम यांचे डायलिसीसमुळे निधन

डायलिसीसमुळे निधन. ते 63 वर्षांचे होते.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

छोट्या पडद्यावरील ठाकूर सज्जन सिंह नावाने परिचीत असणारे अनुपम श्याम यांचे सोमवारी डायलिसीसमुळे निधन झाले. ते 63 वर्षांचे होते.मुंबईच्या गोरेगाव लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मन की आवाज प्रतिज्ञा या सिरीयलमधून ठाकूर सज्जन सिंग या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.

याआधीही होती प्रकृती गंभीर

याआधीही अनुपम श्याम यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून अनुपम हे आजारी आहेत. त्यांच्याकडे पुढील उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्यांचा धाकटा भाऊ अनुराग श्याम ओझा यांनी आर्थिक मदत केली होती.

एनएसडीसोबत काम

अनुपम श्याम यांचा जन्म 20 सप्टेंबर 1957 ला उत्तर प्रदेश येथील प्रतापगढ येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण प्रतापगढ येथे झाले. त्यानंतर लखनऊला भारतेन्दु नाट्य अकादमीवरून त्यांनी नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर दिल्लीच्या श्रीराम सेंटर रंगमंडळ येथे काम केले. त्यानंतर एनएसडीशी जोडले गेले.

जास्त नकारात्मक भूमिका
अनुपम श्याम यांना त्यांच्या कारकीर्दीत जास्त नकारात्मक भूमिकाच मिळाल्या. त्यांनी ‘द लिटिल बुद्धा’ आणि ऑस्कर पुरस्कार विजेता ‘स्लमडॉग मिलेनियर’ यांचाही समावेश आहे. शेखर कपूरच्या ‘बैंडिट क्वीन’मध्ये प्रमुख भूमिका होती. द वॉरियर आणि थ्रेड या चित्रपटातही काम केले.

या चित्रपटात केले काम
‘शक्ति’, ‘हल्ला बोल’, ‘रक्तचरित’, ‘परजानिया’, ‘दास कैपिटल’, ‘पान सिंह तोमर’, ‘हजार चौरासी की मां’, ‘दुश्मन’, ‘सत्या’, ‘दिल से’, ‘जख्म’, ‘कच्चे धागे’, ‘तक्षक’, ‘बवंडर’, ‘नायक’, ‘कसूर’, ‘लगान’, ‘लज्जा’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!