पुणे शहरापाठोपाठ बारामती मधील व्यापाऱ्यांना देखील दिलासा
बारामतीतील व्यापाऱ्यांची विकेंड लॉकडाउन मधून सुटका

पुणे शहरापाठोपाठ बारामती मधील व्यापाऱ्यांना देखील दिलासा
बारामतीतील व्यापाऱ्यांची विकेंड लॉकडाउन मधून सुटका
बारामती वार्तापत्र
बारामतीतील पॉझिटीव्हीटीचा दर पाच टक्क्यांहून कमी आहे, या पार्श्वभूमीवर बारामतीच्या बाजारपेठेस काहीसा दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती, मात्र संपूर्ण जिल्ह्याच्या पॉझिटीव्हीटीचा विचार करुन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील तपासण्यांची संख्या प्रशासनाने लक्षणीयरित्या वाढवली होती, त्यामुळे पॉझिटीव्हीटीचा दर वेगाने कमी झाला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून निर्बंध पाळणा-या व्यापा-यांनी पुढील चार महिने सणासुदीचे असल्याने त्यातून दिलासा द्यावा, अशी मागणी केलेली होती. मात्र फक्त वीकेंड लॉकडाऊनमधूनच त्यांची सुटका झाली आहे
बारामतीतील व्यापा-यांची यामुळे वीकेंड लॉकडाऊनमधून सुटका झाली आहे. दुसरीकडे 3 एप्रिलपासून बंद असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार यांनाही दिलासा मिळाला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत ग्राहकांना परवानगी देण्यात आली असून दुपारी चार नंतर मात्र पार्सल सेवेला परवानगी दिली आहे. साप्ताहिक सुटी वगळून इतर सर्व दिवस हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सुरु राहतील.
लग्नसमारंभ तसेच मनोरंजन व इतर कार्यक्रमांना 50 प्रेक्षक क्षमतेस तर अंत्यविधीस 20 जणांनाच परवानगी असेल. संध्याकाळी पाचपर्यंत जमावबंदी व संध्याकाळी पाच नंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी कायमच ठेवण्यात आली आहे. बारामतीतील दुकानांची वेळही पुण्याप्रमाणेच रात्री आठ वाजेपर्यंत करावी ही मागणी मात्र प्रशासन स्तरावर मान्य झाली नसून पूर्वीप्रमाणेच दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. बारामतीतील व्यापा-यांनी पुण्याच्या धर्तीवरच परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
दुकान मालक-कामगारांना मास्क सक्ती
‘शहरात दुकानामध्ये विक्री करत असताना त्या दुकानातील मालक आणि सेल्समन हे मास्क वापरत नाहीत. कोरोनाचा गांभीर्याने विचार करत दुकानदार तसेच त्याठिकाणी काम करत असलेल्या कर्मचारी यांनी देखील मास्कचा वापर कंपल्सरी केला पाहिजे’, असही अजित पवार यांनी सांगितलं.