इंदापूर

वालचंदनगर पोलीस स्टेशन व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

सामाजिक भान जपणारा उपक्रम घेतला हाती

वालचंदनगर पोलीस स्टेशन व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

सामाजिक भान जपणारा उपक्रम घेतला हाती

इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन वालचंदनगर पोलिस व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी यांकडून सामाजिक भान जपणारा उपक्रम हाती घेण्यात आला असून जंक्शन पोलीस स्टेशन येथे मंगळवारी ( दि.१४ ) भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

एक थेंब देशासाठी, एक थेंब महाराष्ट्रासाठी या घोषवाक्याला अनुसरुन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.रक्तदान शिबीरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास वाहन सुरक्षतेच्या कारणास्तव हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button