रेल्वेकडून जागा मिळत नसेल तर त्यांची वाहने यापुढे जाऊ देऊ नका रेल्वे खात्याविषयी अजितदादांची नाराजी
अनेक महिन्यांपासून रेल्वेच्या मालकीची जागा सेवा रस्त्यासाठी मिळावी म्हणून बारामती नगरपालिकेने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

रेल्वेकडून जागा मिळत नसेल तर त्यांची वाहने यापुढे जाऊ देऊ नका रेल्वे खात्याविषयी अजितदादांची नाराजी
अनेक महिन्यांपासून रेल्वेच्या मालकीची जागा सेवा रस्त्यासाठी मिळावी म्हणून बारामती नगरपालिकेने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
बारामती वार्तापत्र
भिगवण रोड येथील सेवा रस्त्यासाठी रेल्वेकडून जागा मिळत नसेल तर त्यांच्या मालधक्क्याकडे जाणारी वाहने यापुढे जावू देवू नका, त्याशिवाय रेल्वे विभागाला जाग येणार नाही. त्यांना कुठे तक्रार करायचीय ती करू द्या, या शब्दात त्यांनी रेल्वे खात्याविषयी नाराजी व्यक्त केली.
लोकांना जायला-यायला त्रास होणार नाही. पण ते जाग्यावर येत नसतील तर वाहने जावू देवू नका, असे आदेश पवार यांनी दिले.
या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वाहतूक होत असल्याने आजूबाजूला शाळा व विद्यार्थ्यांचा वावर असल्याने तेथे सेवा रस्त्याची गरज आहे. रस्त्यासाठीच रेल्वेची जमिन मागत असताना रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर अजित पवार यांनीच आज निर्णायक भूमिका घेत मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करुन टाकण्याचे आदेश दिले.
या बाबत रेल्वेच्या अधिका-यांनी अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतरही फार काही केले नाही. ही जमीन देण्यास रेल्वेकडून टाळाटाळ सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज थेट आपल्या अधिकारांचा वापर करत रेल्वे मालधक्क्याकडे जाणारी वाहतूकच बंद करुन टाकण्याचे आदेश मिलिंद मोहिते यांना दिले.