तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसीत करण्याबाबत वन विभागाने कार्यवाही करावी : दत्तात्रय भरणे
सूचनांचा योग्य अभ्यास करून कार्यवाही करण्याचे निर्देश
तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसीत करण्याबाबत वन विभागाने कार्यवाही करावी : दत्तात्रय भरणे
सूचनांचा योग्य अभ्यास करून कार्यवाही करण्याचे निर्देश
इंदापूर : प्रतिनिधी
तेंदूपत्ता ई – लिलाव विकसीत करण्याबाबत आलेल्या सूचनांचा योग्य अभ्यास करून वन विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.मंत्रालयातील दालनात तेंदूपत्ता ई लिलाव प्रणाली विकसीत करण्याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( दि.२० ) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दूरदृश्यप्रणालीव्दारे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता,उपसचिव गजेंद्र नरवणे तसेच एजिओ असेट मॅनेजमेंटचे शरद कुमार उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,सध्या तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणालीमध्ये फक्त स्थानिकच व्यापारी सहभागी होतात.मात्र यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी झाले तर तेंदूपत्ताला चांगला दर मिळून तेंदू पत्तामध्ये काम करणा-यांनाही त्याचा फायदा होईल.मात्र यासंदर्भात या क्षेत्रातील उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा निश्चीत विचार करू.एजिओ असेट मॅनेजमेंटचे शरद कुमार यांनी आपल्या मागणीबाबतचा प्रस्ताव वन विभागाला पुढच्या आठवडयात सादर केल्यानंतर त्यावरती सर्वानुमते निणर्य घेण्याची ग्वाही यावेळी वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
प्रसंगी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता यांनी सध्याची तेंदूपत्ता ई – लिलाव प्रणालीबाबत बैठकीत माहिती दिली.तसेच एजिओ असेट मॅनेजमेंटचे शरद कुमार यांनी नाविन्यपूर्ण तेंदूपत्ता ई-लिलाव प्रणाली कशा प्रकारे सर्वांसाठी फायद्याची आहे याची माहिती बैठकीत दिली.