एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना 24 तासांत कामावर हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्तीची नोटीस

विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संप पुकारलाय. 

एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना 24 तासांत कामावर हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्तीची नोटीस

विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संप पुकारलाय.

प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असं या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार178 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहापर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा संप सुरु आहे. अशातच मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी ड्युटीवर हजर झाले होते. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button