इंदापूर

क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत- हर्षवर्धन पाटील

मास्टर गेम्स स्पर्धेचे उदघाटन संपन्न

क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत- हर्षवर्धन पाटील

मास्टर गेम्स स्पर्धेचे उदघाटन संपन्न

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानिमित्त व फिट इंडिया उपक्रमांतर्गत मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापुरमध्ये २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर रोजी चार दिवसीय मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, अशा स्पर्धांच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत.
त्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.ही स्पर्धा वय वर्ष ३० च्या पुढील वयोगटासाठी असून यामध्ये ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, सायकलिंग, फुटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल यासारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,’ इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी संस्था असून ग्रामीण भागातील मुला-मुलींना खेळाडू म्हणून तयार करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेत त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे. बलशाही युवक निर्माण करणे हे ब्रीद वाक्य या संस्थेचे असून सदरील स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची निवड तेलंगणा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे.इंदापूरमध्ये ही स्पर्धा होत असल्याने त्याचा आनंद आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यस्तरीय मास्टर गेम्सचे सचिव बाळा चव्हाण तसेच राष्ट्रीय खेळाडू आणि आयकर अधिकारी सुजित बडदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेचे अध्यक्ष दिपू के, उपाध्यक्ष सुनील जाधव, पुणे जिल्हा मास्टर गेम्सचे सचिव महेंद्र बाजारे, कोषाध्यक्ष केतन डिसील्वा, वरिष्ठ सचिव प्रभाकर दुबे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, संस्थेचे खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, सहसचिव प्रा.बाळासाहेब खटके, संचालक विलास वाघमोडे, तुकाराम जाधव, गणपत भोंग, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक बापू घोगरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button