कोरोंना विशेष

चिंताजनक बातमी; जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संकट आला ; दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘तो’ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आता असली तरी दिवाळीनंतर या संख्येत वाढ झाली आहे.

चिंताजनक बातमी; जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संकट आला ; दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘तो’ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आता असली तरी दिवाळीनंतर या संख्येत वाढ झाली आहे.

प्रतिनिधी

जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संकट घोंगावतंय. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवी नियमावलीही जाहीर केली आहे. दरम्यान आता राज्यातील जनतेसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान या व्यक्तीला ऑमायक्रॉन या नव्या विषाणूची लागण झालेली आहे की नाही, हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावी लागणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे या व्यक्तीच्या कुटुंबियांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आता आरोग्य विभागाचं लक्ष हे जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे लागून राहिलं आहे.

माहिती गोळा करण्याचे काम सुरु
केवळ दक्षिण आफ्रिकेतीलचा नव्हे तर हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल यासारख्या देशातून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले आहे. ओमिक्रॉन विषाणूचा वाढत धोका लक्षात घेत महापालिकेकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

यासाठीविमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे.विषाणू आढळल्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट हवाई वाहतुकीची सोया नाही. त्यामुळे ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागरिक शहरात परतले आहेत त्याची माहिती जमावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आता असली तरी दिवाळीनंतर या संख्येत वाढ झाली आहे.

Related Articles

Back to top button