
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
ट्विट करुन दिली माहिती
प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करून पवार यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असून, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.
शरद पवार यांचं ट्विट
शरद पवार यांच्यावर घरीच उपचार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता.
शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द?
राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त 25 जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.