इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी ८ कोटी ५ लक्ष मंजूर : ना.दत्तात्रय भरणे
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट

इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी ८ कोटी ५ लक्ष मंजूर : ना.दत्तात्रय भरणे
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी ८ कोटी ५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी शासकीय आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन व बांधकामांसाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यानुसार इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी १ कोटी १५ लक्ष, पोंदकुलवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी १ कोटी १५ लक्ष, बोरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी २ कोटी ३० लक्ष, अगोती नं.१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी १ कोटी १५ लक्ष , अंथूर्णे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी १ कोटी १५ लक्ष, डाळज नं.१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी १ कोटी १५ लक्ष अशा एकूण सहा ठिकाणी ८ कोटी ५ लक्ष रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वेळोवेळी नवीन आरोग्य संस्था स्थापनेस श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात आली आहे. प्रामुख्याने बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरीता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो.कोरोनाच्या संसर्गजन्य रोगांच्या अनुषंगाने उपचारात आवश्यक बदल व अत्याधुनिक सुविधांचा भर दिला जातो. सदरील कामे मंजूर झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने काम करू शकेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.