४ वर्षाखालील मुलांना दुचाकीवर बसवायचं असल्यास,हे नियम न पाळल्यास भरावा लागेल दंड

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

४ वर्षाखालील मुलांना दुचाकीवर बसवायचं असल्यास,हे नियम न पाळल्यास भरावा लागेल दंड

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

मुंबई :प्रतिनिधी

येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक रस्त्यांवर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. चार चाकी वाहनांच्या तुलनेत तरुणाईची पसंती सध्या दुचाकी वाहनांना मिळताना दिसत आहे. अशा दुचाकी वाहनांसंदर्भातील काही नवे नियम सध्या परिवहन मंत्रालयानं जारी केले आहेत.

एखाद्या कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांना तीन मुलं जरी असतील, तर हे सर्व जण दुचाकीवर बसून प्रवास करतात. असे अनेक फोटोज तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. आपला आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा जीव धोक्यात घालून प्रवास केला जातो.

चार चाकी वाहनांच्या तुलनेत तरुणाईची पसंती सध्या दुचाकी वाहनांना मिळताना दिसत आहे. अशा दुचाकी वाहनांसंदर्भातील काही नवे नियम सध्या परिवहन मंत्रालयानं जारी केले आहेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आधीच्या नियमांपेक्षा हे नियम मुलांसाठी सुरक्षित असून या नियमाचे पालन न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी 2022 रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हे नियम पुढील वर्षी म्हणजेच 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहेत. सध्या या नियमातील दंडाची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. दंडाची रक्कम राज्य सरकारे स्वत: ठरवतील, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

नव्या नियमांनुसार, दुचाकी वाहनांवर जर 4 वर्षांपर्यंतचा बालक असेल तर वेगमर्यादा ही 40 किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावी. तसेच दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलाने क्रॅश हेल्मेट घालणं आवश्यक आहे. याशिवाय, 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर नेताना सेफ्टी हार्नेसचा वापर करावा.

काय असतं सेफ्टी हार्नेस?

दुचाकीवर लहान मुलांना बसवत असतानाचे हे नियम वाचल्यानंतरच प्रवासाला लागा. कारण, हे नियम अतिशय महत्त्वाचे असे आहेत.

15 फेब्रुवारीपासूनच 9 महिने ते 4 वर्षे या वयोगटातील मुलांना घेऊन जात असताना नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावं याचे निर्देश शासनानं दिले आहेत.

वेगमर्यादेपासून, सुरक्षिततेपर्यंतचे हे नियम आहेत तरी कसे, जाणून घ्या… 
– दुचाकीवर वयवर्ष 9 महिने ते 4 वर्षे या वयोगटातील मुलांना सोबत नेत असताना त्यांच्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करावा.

– हार्नेस वॉटरप्रूफ आणि लाईट केअरिंग, ड्युरेबल असावा.

– 4 हून कमी वयाची मुलं दुचाकीवरून घेऊन जात असल्यात वेगमर्यादा 40 किमी प्रतितास इतकीच असावी.

– हेल्मेटचा वापर सक्तीचा असेल. लहानग्यांच्या मापाचं हेल्मेट वापरावं.

– लहान मुलांना हेल्मेट नसल्यास दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात येणार आहे.

कसं असावं हेल्मेट? 
लहान मुलांचं हेल्मेट कमी वजनाचं आणि वॉटरप्रूफ असावं. हेल्मेट बाजारात येईपर्यंत सायकलिंग हेल्मेट वापरण्याची मुभा असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button