राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या इंदापूर मध्ये
पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या इंदापूर मध्ये
पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील बुधवारी (दि.२३) इंदापूर येथे येणार आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाचव्या टप्यातील संवाद यात्रा सध्या सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष ॲड.महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे इत्यादी प्रमुख अतिथी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
२२ गावांच्या पाणी प्रश्नावर तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नेमकं काय बोलणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने, मंगळसिद्धीचे चेअरमन राजेंद्र तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या वैशाली पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने, अभिजित तांबिले, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ,सागर मिसाळ यांबरोबरच तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी,कार्येकर्ते उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रम शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.