मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

चौैकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

चौैकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईः प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. आर्थिक गैरव्यवहार संबंधित चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मलिक ईडी कार्यालयात सकाळीच 7.30 वाजता पोहोचल्याची माहिती आहे. ईडीने नवाब मलिक यांना चौकशीसाठीचे समन्स पाठवले होते.

मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरू आहे. अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी केलेल्या आरोपांनी राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

मलिकांवर काय आहेत आरोप?

मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

प्रकरण काय?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

 

Back to top button