बारामतीच्या कराटे खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश
स्पर्धेत सेन्सई अनुराग देशमुख यांना सर्वोत्तम पंच हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बारामतीच्या कराटे खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश
स्पर्धेत सेन्सई अनुराग देशमुख यांना सर्वोत्तम पंच हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बारामती वार्तापत्र
6 मार्च 2022 रोजी सांगली येथे झालेल्या 5 व्या खुल्या कराटे चॅम्पियनशिप 2022 मध्ये बारामतीच्या चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन च्या 7 मुलांनी भाग घेऊन 7 गोल्ड व 7 कांस्य मिळऊन यश संपादन केले.
त्यामध्ये अमोश बिके 2 सुवर्ण ,पार्थ शेटे 2 सुवर्ण ,ओमराज धायगुडे 1 सुवर्ण ,1 रौप्य ,आर्यन पवार 1 सुवर्ण ,1रौप्य , अर्जुन वीर 1 सुवर्ण ,1 रौप्य , आदित्य साळुंखे 2रौप्य , आर्यन श्रीरसागर 2रौप्य अशी ऐकून 14 पदके पटकावून बारामतीचे नाव उंचावले आहे. या विद्यार्थ्यांना सेन्सेई अनुराग देशमुख ( संस्थापक चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन ) यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र धरून 6 राज्यातील कराटे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत सेन्सई अनुराग देशमुख यांना सर्वोत्तम पंच हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बारामतीचे चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन चे विद्यार्थी वेळेवेळी बारामतीचे नाव उंचावत राहतात व असेच उंचावत राहतील अनुराग म्हणाले.