इंदापूर

चाकटीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

राज्यमंत्र्यांनी चाकाटी परिसराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

चाकटीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

राज्यमंत्र्यांनी चाकाटी परिसराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील मौजे चाकाटी येथे १४ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी (दि.१३) संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेने मला आमदार, मंत्री होण्यासाठी मनापासून सहकार्य केले आहे. त्यामुळे गोरगरीब माणसांसाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी असते. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे नागरिकांनी उभे राहावे. चाकाटी परिसराच्या विकासासाठी हवा तितका निधी दिला जाईल.या परिसराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना नवनाथ रुपनवर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून चाकाटी गावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला असून आगामी राहिलेल्या उर्वरित कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे येथील जनता कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नाळ कधीही तोडू देणार नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, दत्तात्रय घोगरे, युवक नेते नवनाथ रुपनवर, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष छाया पडसळकर,कार्याध्यक्ष अतुल झगडे, संजय देवकर, सुरेश शिंदे, सुभाष पाटील, सरपंच संजय बबन रुपनवर, उपसरपंच शुभांगी तनपुरे , सदस्य समाधान घोडके,भारत मारकड, केशव मारकड, नवनाथ पाटील, बापू हांडे, विजय मारकड, आप्पासाहेब मारकड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व चाकाटी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री दत्तात्रय भरणेंनी गावच्या विकासाकरिता भरघोस निधी दिल्याने गावातील चिमुकल्यांनी राज्यमंत्र्यांचा सत्कार केला.

Related Articles

Back to top button