महागाईचा भडका, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ आता सर्वसामान्यांना आणखी एक दरवाढ;१ मे पासून सलून-ब्यूटी पार्लर सेवा महागणार!
हा निर्णय राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला आहे.

महागाईचा भडका, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ आता सर्वसामान्यांना आणखी एक दरवाढ;१ मे पासून सलून-ब्यूटी पार्लर सेवा महागणार!
हा निर्णय राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई,प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेले सलून आणि ब्युटीपार्लर अखेर सुरू करण्यात येत आहेत. मात्र, हे सुरू करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशसनकडून घेण्यात आला आहे.
राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत निर्णयशहरी व ग्रामीण भागात 30% दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे कामगार दिन पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नागरीकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे अवाहन सलून & ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी केले आहे.
सलून व्यवसायात काम करणारे अनेक कारागीर हे उत्तर प्रदेश भागातील आहे. सध्या अनेक कामगार मुंबई सोडून गेले आहेत. यामुळे आता नवीन कारागीर कुठून आणायचे असा प्रश्न मालकांसमोर उभा राहिला आहे. भविष्यात दुकाने सुरू झाल्यानंतर पीपीई किट्सचा वापर, वापरल्या जाणाऱ्या सामानांचे निर्जंतुकीकरण करणे, इत्यादीसाठी लागणारा नवा खर्च सलून मालकांना उभा करावा लागणार आहे. हा विचार करूनच केस कापणे, दाढी करणे याशिवाय सलूनमध्ये होणाऱ्या विविध कामांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. राज्यभरातून दरवाढ करण्यासाठी व्यावसायिकांची मागणी होत होती, असे त्यांनी सांगितले. सध्या सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनचे 52000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत, असी माहिती त्यांनी दिली.
दरवाढीचे प्रमुख कारणे:
1) ब्युटी प्रॉडक्ट/पेट्रोल/गॅस सिलेंडर/खाद्यतेल/शाळांची फी या व सर्व प्रकारची वाढती दरवाढ
2) कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन नंतर व्यवसायामध्ये 50% ग्राहकांची झालेली कमी व वाढती बेरोजगारी
3) सरकारचे कायमच नाभिक समाज व सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरू असलेले दुर्लक्ष