बारामतीची लालपरी पुन्हा रस्त्यावर पूर्ण क्षमतेने सुरू
डेपोत शंभर टक्के एसटी कर्मचारी कामावर हजर..

बारामतीची लालपरी पुन्हा रस्त्यावर पूर्ण क्षमतेने सुरू
डेपोत शंभर टक्के एसटी कर्मचारी कामावर हजर..
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राची लाडकी लालपरी आता परत एकदा रस्त्यावर दिमाखात पळतांना दिसत आहे. लालपरीची चाके जस – जसी पळताहेत तस – तसे महामंडळाच्या तिजोरीतही लक्ष्मीचे आगमन होत असल्याचे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.. मात्र न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एफ्रिल हा शेवटचा कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता त्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. बारामतीतील शंभर टक्के एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.. यामुळे आता लाल परी पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे..
चौकट :
एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर तातडीने सातवा वेतन आयोग लागू करू असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं.. आता राज्यातील सर्वच एसटी कर्मचारी कामावर हजर झाला आहे त्यामुळे आता राज्य सरकारने तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे..