पुन्हा निराशा; नवनीत राणा आणि रवी राणा यांचा सेशन कोर्टात दिलासा नाहीच, जामिन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
शिवडी येथील विशेष कोर्टात जामीन अर्ज प्रलंबित असताना राणा दाम्पत्याने सेशन्स कोर्टातही जामीन अर्ज केला होता.

पुन्हा निराशा; नवनीत राणा आणि रवी राणा यांचा सेशन कोर्टात दिलासा नाहीच, जामिन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
शिवडी येथील विशेष कोर्टात जामीन अर्ज प्रलंबित असताना राणा दाम्पत्याने सेशन्स कोर्टातही जामीन अर्ज केला होता.
मुंबई : प्रतिनिधी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. राणा दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालय सुनावणी करणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवर 29 एप्रिल पर्यंत उत्तर देण्यासाठी सरकारला न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानंतर जामिनावर सुनावणीची तारीख देण्यात येणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडून वेळ मागितला होता. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य करत सरकारला उत्तर देण्यात सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानात हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणेनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने शिवडी येथील विशेष कोर्टात जामीन अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना आणि त्यावर २९ एप्रिलला सुनावणी असतानाही त्यांनी सेशन्स कोर्टातही जामीन अर्ज केला होता.
नेमकं प्रकरण काय?
नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.