१ मे पासून विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभाच्या सेवा
येत्या १ मे पासून राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी काही सेवा निर्धारित केल्या आहेत.

१ मे पासून विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभाच्या सेवा
येत्या १ मे पासून राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी काही सेवा निर्धारित केल्या आहेत.
पुणे ; प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ अधिनियमान्वये राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या सेवा निर्धारित केल्या आहेत. येत्या १ मे पासून विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभाच्या सेवा प्रत्यक्ष दिल्या जातील अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ अधिनियमान्वये नागरिकांना दिलेल्या सेवा पारदर्शी पदधतीने व विहित मुदतीत देणे अधिक सुकर झाले आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागाने काही सेवा या अधिनियमांतर्गत अधिसुचित केल्या आहेत.
केवळ तेवढयाच सेवा अपेक्षित नसून त्या व्यतिरिक्त नागरीकांच्या गरजेनुसार प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा अधिसूचित करणे अभिप्रेत आहे. याच बाबींचा विचार करून येत्या १ मे पासून राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी काही सेवा निर्धारित केल्या आहेत. विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या सेवा प्रत्यक्ष संबंधितांना दिल्या जाणार आहेत.