‘बजेट तुमचे,औषध आमचे ‘ ही संकल्पना येईल: जगन्नाथ शिंदे
केमिस्ट ड्रॅगीस्ट कार्यकर्ता मेळावा बारामती मध्ये संपन्न
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2022/05/IMG-20220513-WA0073-780x470.jpg)
‘बजेट तुमचे,औषध आमचे ‘ ही संकल्पना येईल: जगन्नाथ शिंदे
केमिस्ट ड्रॅगीस्ट कार्यकर्ता मेळावा बारामती मध्ये संपन्न
बारामती वार्तापत्र
औषध विक्रेते मध्ये स्पर्धा वाढली,मोठे भांडवलदार यांचा प्रवेश झाला,त्यामुळे औषध खरेदी साठी आलेल्या रुग्णांना इतर सुविधा देत जावा ,लवकरच बजेट तुमचे औषध आमचे ही सुद्धा संकल्पना येईल असे भाकीत माजी आमदार व महाराष्ट्र राज्य केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.
बारामती, इंदापूर,दौंड,पुरंदर तालुक्यातील केमिस्ट ड्रॅगीस्ट कार्यकर्ता मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते या वेळी विजय पांडुरंग पाटील ,सुशील भाई शहा,अनिल बेलकर व जयंत तावरे,सत्यशील पाटील,गणेश ठोंबरे ,सूर्यकांत खटके,बाळासाहेब भिंताडे, नाना राजपुरे, अशोक ओसवाल व बारामती फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ राजेंद्र पाटील,शारदा नगर चे प्राचार्य डॉ अविनाश गानबोटे, महेश शेंडे आदी मान्यवर उपस्तीत होते प्रत्येक फार्मासिस्ट ने कॉम्प्युटराईज्ड व अत्याधुनिक होऊन रुग्णांना औषध विक्री शिवाय ,मार्गदर्शन,सल्ला द्या, २४ तास उत्तम सेवा द्या.
येणाऱ्या काळात फार्मासिस्ट ना रुग्णांना कोणते औषध द्यावयाचे हे ठरवावे लागेल डोस द्यावे लागतील व रुग्णाच्या बजेट नुसार औषधे द्यावी लागतील भांडवलदार बरोबर स्पर्धा तीव्र आहे पण आपण नक्की जिंकू असा विश्वास जगन्नाथ शिंदे यांनी उपस्तीताना दिला भांडवलदार कंपन्या रुग्णांना दिखाऊ पणा व डिस्काऊंट ची खोटी आकडेमोड दाखविण्यात यशस्वी होत असताना रुग्णांना विश्वास द्या ग्राहकांनी खोट्या व तात्पुरत्या आमिषाला बळी पडू नका या साठी आपली सेवा उत्तम व वाजवी द्या असे विजय पांडुरंग पाटील यांनी सांगितले.
“ऑनलाइन धंदा,भांडवलदार चा प्रवेश, शासनाचे कडक कायदे ,या मुळे नफा कमी होत असताना रुग्णांना उत्कृष्ट सेवा व वाजवी दर द्या येत्या तीन ते चार वर्षात प्रत्येक शहरातील भांडवलदार चे मोठे स्टोअर बंद पडेल” असा आशावाद प्रत्येक व्यक्त्यांनी करताच मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून दाद दिली जात होती प्रास्ताविक सी ए पी डी चे सदस्य सूर्यकांत खटके यांनी केले.
या प्रसंगी स्वर्गीय राजू धोका यांच्या समरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धातील विजेत्या संघाला अनिल बेलकर यांनी रोख पंधरा हजाराचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते दिले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार भारत मोकाशी यांनी मानले.