इंदापूर विधानसभेसाठी ३८ उमेदवारांचे ५२ अर्ज

इंदापुरात दोन भरणे, तीन पाटील दिसणार

इंदापूर विधानसभेसाठी ३८ उमेदवारांचे ५२ अर्ज

इंदापुरात दोन भरणे, तीन पाटील दिसणार

इंदापूर प्रतिनिधी-

इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीअंती 38 उमेदवारांनी 52 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि.29) ऑक्टोबर रोजी 18 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले. यामुळे इंदापूर विधानसभेसाठी एकूण 38 उमेदवारांनी 52 अर्ज दाखल केले.

इंदापुरात दोन भरणे, तीन पाटील दिसणार

इंदापूर विधानसभेसाठी दाखल निवडणूक अर्जामध्ये विद्यमान आमदार दत्तात्रेय विठोबा भरणे यांच्या नावाप्रमाणे दूसरे नाव असलेले शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील दत्तात्रेय सोनबा भरणे यांनीही इंदापूर विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच माजी आमदार हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांच्या नावाप्रमाणे माळशिरस तालुक्यातील हर्षवर्धन गोपाळराव पाटील व निमगाव केतकी येथील हर्षवर्धन श्रीपती पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. इंदापूर विधानसभेसाठी दोन दत्तात्रेय भरणे आणि तीन हर्षवर्धन पाटील निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram