स्थानिक

“शेती खाणाऱ्या गोगलगायी पासून पर्यावरणपूरक तंत्रज्ञान – विद्यार्थ्यांचा नवा शोध!”

विद्या प्रतिष्ठान जेवतंत्रज्ञान च्या विद्यार्थ्यांना यश

“शेती खाणाऱ्या गोगलगायी पासून पर्यावरणपूरक तंत्रज्ञान – विद्यार्थ्यांचा नवा शोध!”

विद्या प्रतिष्ठान जेवतंत्रज्ञान च्या विद्यार्थ्यांना यश

बारामती वार्तापत्र

भारतीय शेतीसाठी डोकेदुखी ठरणारी विशाल आफ्रिकन गोगलगाय (Achatina fulica) आता निसर्गस्नेही तंत्रज्ञानाचा स्रोत बनू शकते! विद्या प्रतिष्ठान च्या जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व संशोधक श्रेया गिरमकर यांनी या आक्रमक प्रजातीवर संशोधन करून तिच्या जठरातील विशेष Firmicutes बॅक्टेरियाचा वापर करून शेतीतील कचरा अवघ्या १२ तासांत विघटित करणारी पावडर विकसित केली आहे.

ही गोगलगाय भारतात वेगाने पसरत आहे आणि अनेक शेती पिके नष्ट करत आहे. मात्र, या संशोधनामुळे एका विध्वंसक प्रजातीचा उपयोग जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो.

आक्रमक गोगलगायीचे जैविक पुनर्वापरासाठी रूपांतर,शेतीतील कचऱ्याचे जलद विघटन – अवघ्या १२ तासांत!, सेंद्रिय शेती आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचा शोध, वैद्यकीय आणि सौंदर्यप्रसाधन क्षेत्रासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात
श्रेया गिरमकर यांनी गोगलगायीच्या लाळेतून ‘म्युसिन’ (Mucin) वेगळे काढले आहे, ज्याचा उपयोग वैद्यकीय आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात होऊ शकतो. या संशोधनामुळे शेतीस हानी पोहोचवणाऱ्या गोगलगायीचा वापर सकारात्मक दिशेने करता येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा प्रकल्प जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला असून, भविष्यात हे संशोधन जैविक तंत्रज्ञानासाठी नवे मार्ग खुले करू शकते.

ही गोगलगाय जैवविविधतेसाठी घातक असली, तरी तिचा वैज्ञानिक उपयोग करून पर्यावरणस्नेही उपाय शोधला जाऊ शकतो, म्हणजेच आपत्तीला संधीमध्ये बदलणारा संशोधन होय या पावडरचे व्यावसायीकरण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास फायदा होईल ,आक्रमक प्रजातींचा पुनर्वापर करून पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा संशोधकांचा प्रयत्न शेतकऱ्यांना वरदान आहे
शेतीच्या नुकसानाचा संदर्भ देऊन उपाय सुचवला आहे, त्यामुळे शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून
या तंत्रज्ञानाचा भविष्यातील उत्तम शेतीसाठी उपयोग होऊ शकतो.

चौकट:
गोगल गाय पासून शेतीचे खूप मोठे नुकसान होत असते ते नुकसान टाळण्यासाठी सदर संशोधन मुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे :
श्रेया गिरमकर बीएससी बायोटेक्नॉलॉजी विद्या प्रतिष्ठान बारामती

चौकट:
नैसर्गिक खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर आपत्ती येत असते त्यात गोगलगायमुळे व इतर कीटक मुळे होणारे नुकसान टळणार असल्याने सदर संशोधन म्हतपूर्ण असल्याने शासनाने सर्वोतोपरी तातडीने संशोधनास सहकार्य करावे:
झुंझारराव जगताप शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!