अनेकान्त स्कूलमध्ये शक्ति अभियान पथकाची कार्यशाळा
सुरक्षितता, सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महिलांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी.
अनेकान्त स्कूलमध्ये शक्ति अभियान पथकाची कार्यशाळा
सुरक्षितता, सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महिलांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी.
बारामती वार्तापत्र
बारामती. दि. ३१/०१/२०२५ रोजी अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचलित अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. ५ ते इ. १० वी च्या
विद्यार्थ्यांकरिता शक्ती अभियान पथक, उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालय, बारामती यांच्याद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सुरक्षितता, सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महिलांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी. नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
कायद्याच्या अंमलबजावणीचा एक मजबूत आधारस्तंभ, सुव्यवस्था आणि न्याय राखण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत असे सांगत, महिला पोलीस हवालदार शुभांगी दणाणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता कदम व प्रणाली भोसले यांनी कार्यशाळेमध्ये संयुक्तपणे मार्गदर्शन केले.