बारामतीच्या टेक्निकल केंद्रावरती दहावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू-गुलाब पुष्प देऊन परीक्षार्थींचे स्वागत
केंद्रावरती 499 विद्यार्थी परीक्षा देणार

बारामतीच्या टेक्निकल केंद्रावरती दहावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू-गुलाब पुष्प देऊन परीक्षार्थींचे स्वागत
केंद्रावरती 499 विद्यार्थी परीक्षा देणार
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन.आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामती या 1352 केंद्रावरती एसएससी परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2025 आजपासून सुरळीत सुरू झाली असून आज पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन परीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले .
यावेळी या केंद्राचे केंद्र संचालक श्री जयवंतराव मांडके, उपकेंद्र संचालक श्री सोमनाथ मिंड परीक्षा सहाय्यक लालासाहेब आडके, निलेश गायकवाड, विकास जाधव,आनंदराव करे,श्री सुधीर जाधव व इतर सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या केंद्रावरती 499 विद्यार्थी परीक्षा देणार असून या सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा केंद्राचे केंद्र संचालक श्री जयवंतराव मांडके यांनी दिल्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत कोणताही विद्यार्थी कॉपी करणार नसून ते संदर्भातल्या सूचना उपकेंद्र संचालक श्री सोमनाथ मिंड सर यांनी दिल्या.
या केंद्रवरती आर.एन.आगरवाल, एम एस हायस्कूल, शाहू हायस्कूल धो. आ .सातव विद्यालय ,उर्दू हायस्कूल बारामती, न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी, अंजनगाव विद्यालय, भैरवनाथ विद्यालय उंडवडी ,सांगवी विद्यालय अशा विविध शाळांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत.