दूधगंगा दूध संघाच्या अवसायानाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती-हर्षवर्धन पाटील,
राज्यमंत्र्याकडून संघास जाणीवपूर्वक अडथळे होत असल्याचा ही केला आरोप.
दूधगंगा दूध संघाच्या अवसायानाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती-हर्षवर्धन पाटील,
राज्यमंत्र्याकडून संघास जाणीवपूर्वक अडथळे होत असल्याचा ही केला आरोप…
इंदापूर: सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ चालु राहू नये म्हणून राज्याचे दुग्धव्यवसाय विकास खात्याचे राज्यमंत्री असलेले इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे जाणून-बुजून मंत्रीपदाचा वापर करून दबाव आणून अडथळे आणत आहेत.
मात्र शासनाने दिलेल्या अवसायानाच्या अंतरिम आदेशाला उच्च न्यायालयाने दि.23 जून रोजी पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघा विरोधात तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका निंदनीय व शेतकरी विरोधी तसेच सहकार चळवळीच्या विरोधात आहे, अशी जोरदार टीका राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.24) इंदापूर येथे केली.
इंदापूर येथील दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने जगप्रसिद्ध अमूल बरोबर करार केला असून संकलन दि.8 जून पासून सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर दूधगंगा दूध संघाच्या कार्यालयामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी दुध संघाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टिकास्त्र सोडले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ सुरू होऊ नये तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत.
शासनाचे धोरण हे सहकार चळवळ वाढीचे असते, मात्र तालुक्याचे राज्यमंत्री शासनाच्या धोरणाविरोधात सहकारी संघ अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याकडील दुग्ध व्यवसाय विकास खात्याने संघाला दि.16 रोजी गडबडीत रात्री 11.05 मिनिटांनी गैरलागू कारणे नमूद करून व सहकारातील नियमांची प्रक्रिया बाजूला ठेऊन दिलेल्या अवसायानाच्या अंतरीम नोटिशीला आम्ही कायदेशीर असे उत्तर दिले आहे.
सदरची शासनाची नोटीस चुकीचे असल्याने न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.तसेच दूध संघाकडून दि. 20 जून पर्यंतच्या दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
दुध संघाने अमूलशी करार केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.मात्र मंत्रिपदावर असलेले लोकप्रतिनिधी राजकीय हेतूने शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका घेत संघास विरोध करीत आहेत.
मात्र शासनाचे कामकाज हे नियमानुसार चालते, एखाद्या व्यक्तीच्या आकसापोटी चालत नाही,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना अमूल च्या मार्फत मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष उत्तम जाधव, उदयसिंह पाटील, लालासाहेब पवार, कृष्णाजी यादव, भरत शहा, विलास वाघमोडे, देवराज जाधव, कांतीलाल झगडे, महेद्र रेडके,संजय देहाडे, दीपक जाधव, नानासाहेब शेंडे,पराग जाधव, पिंटू काळे, निलेश देवकर, दत्तात्रय शिर्के, वसंत मोहोळकर, आबासाहेब शिंगाडे, कैलास कदम, सुभाष काळे, रघुनाथ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.