बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ

पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरवले तर त्याचा अधिकचा फायदा विहीरीच्या पाण्याची पातळी वाढण्यात होतो

बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ

पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरवले तर त्याचा अधिकचा फायदा विहीरीच्या पाण्याची पातळी वाढण्यात होतो

बारामती वार्तापत्र 

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने ग्रामपंचायत वंजारवाडी यांच्या सहकार्याने प्रकल्प मेघदूत अंतर्गत भिगवण रस्त्यानजिक वंजारवाडी येथील ओढा खोलीकरण कामाचा मंगळवारी (दि. 13 मे) शुभारंभ झाला.

बारामती तालुका टंचाईमुक्त व्हावा, उन्हाळ्यातही पाणीटंचाई जाणवू नये, या उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या माध्यमातून पंचवसीहून अधिक गावांमध्ये ओढा खोलीकरण व सरळीकरणाची कामे केलेली आहेत. हे काम असेच सुरु ठेवण्याचा माझा व माझ्या सहका-यांचा संकल्प आहे.
पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरवले तर त्याचा अधिकचा फायदा विहीरीच्या पाण्याची पातळी वाढण्यात होतो, हे दिसून आले आहे. त्या नुसार वंजारवाडी ओढयाच्या खोलीकरणाचे काम सध्या सुरु केले आहे. बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे, वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे, माजी सरपंच महादेव चौधर, माजी सरपंच बबनराव तावरे, सोमनाथ गायकवाड, सदस्य नितीन चौधर, नवनाथ चौधर, बाबासाहेब ठोकळे, आनंद सावंत,आजीनाथ खाडे, पोलीस पाटील पोपटराव चौधर, ग्रामसेवक निलेश लोवटे आणि फोरम सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button