बारामती नगरपरिषद व एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने स्वच्छता मोहिम
शहरातील वृक्षांची संख्या अधिक वाढावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

बारामती नगरपरिषद व एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने स्वच्छता मोहिम
शहरातील वृक्षांची संख्या अधिक वाढावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.
बारामती वार्तापत्र
शहर स्वच्छ, सुंदर व हरित असावे या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बारामती नगरपरिषद व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी (ता. 4) स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले गेले.
खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले गेले. शहरातील मेहता हॉस्पिटलसमोरील रस्ता तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंच्या परिसराची नगरपरिषदेचे कर्मचारी, एन्व्हॉर्यमेंटल फोरमचे सदस्य, स्थानिक नागरिक यांनी स्वच्छता केली.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह नगरपालिका विभाग प्रमुख व फोरमचे अनेक सदस्यांनी या परिसरातील स्वच्छता केली.
या अभियानाच्या निमित्ताने या परिसरातील नागरिकांनीही या पुढील काळात हा परिसर अधिक स्वच्छ कसा राहिल, याकडे लक्ष देण्याची ग्वाही दिली. या पूर्वीही नगरपरिषद व फोरमच्या वतीने मोठया प्रमाणावर स्वच्छतेसह, वृक्षारोपण व जनजागृतीची कामे करण्यात आली आहेत.
गुरुवारी (ता. 5) बारामती नगरपरिषद व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंड़ियाच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरातील वृक्षांची संख्या अधिक वाढावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. फोरमच्या वतीने वर्षभर विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जाते.