कृषी

कृषी महाविद्यालय बारामतीत मायक्रोसॉफ्ट- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग वरील कार्यशाळा संपन्न

आठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या आणि जागतिक स्तरावरील टॉप १०० ट्रेनर च्या यादीत समावेश

कृषी महाविद्यालय बारामतीत मायक्रोसॉफ्ट- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग वरील कार्यशाळा संपन्न

आठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या आणि जागतिक स्तरावरील टॉप १०० ट्रेनर च्या यादीत समावेश

बारामती वार्तापत्र

मायक्रोसॉफ्ट-कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या विषयावर तीन दिवसीय महत्वपूर्ण कार्यशाळा ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत डॉ शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती येथे नुकतीच पार पडली.

आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अलिकडच्या काळात शेती आणि शेतीपुरक उद्योग क्षेत्रात प्रचलित होत आहे. त्या अनुषंगाने डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या वतीने या कार्यशाळेचे दिनांक ०९ जून २०२५ ते ११ जून २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

डेटा ॲनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग व पॉवर प्लॅटफॉर्म इत्यादी विषयात जागतिक स्तरावर प्रशिक्षणचा आठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या आणि जागतिक स्तरावरील टॉप १०० ट्रेनर च्या यादीत समावेश असलेल्या मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड ट्रेनर शालिनी रघुवंशी या कार्यशाळेच्या प्रशिक्षक होत्या.

या कार्यशाळेत कृषी पदवी, कृषी पदव्युत्तर पदवी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन (ए.बी.एम.) व पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.) च्या एकूण १२० हुन अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेमध्ये डाटा ॲनालिटिक्स, व्हिज्युअलाईझाशेन वित पॉवर बीआय, मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि ए. आय सर्व्हिसेस (ॲझुर), ॲटो मशिन लर्निंग, को-पायलट, चॅट जी.पी.टी यांसारख्या विषयांवर सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रात्यक्षिक रित्या प्रशिक्षण देण्यात आले.

पहिल्या दिवशी डेटा अनालिटिक्स आणि विज्वलायझेशन ऑफ पावर बी आय म्हणजेच मायक्रोसॉफ्टचे एक्सेल मधील सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चे एक्सेल व्हर्जन व त्याचा कृषी क्षेत्रामध्ये वापर तसेच को पायलट ॲप विषयी माहिती व प्रात्यक्षिक घेण्यात आले.

याचा वापर करून कृषीचे विद्यार्थी कृषी विषयक डाटा जलदरीत्या अनालाईज करू शकतात. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मायक्रोसॉफ्ट क्लाऊड सर्विस व मशीन लर्निंग विषयी महत्त्वपूर्ण असे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यामध्ये मायक्रोसॉफ्ट ॲझुर मध्ये असणाऱ्या विविध रिसोर्सेस संदर्भात तसेच ओपन एआय बिल्डिंग लँग्वेजेस स्पीच ॲप डेव्हलपमेंट कस्टम मॉडेल्स चॅट जीपीटी अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिक देण्यात आले. सदर कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना शिकलेल्या विविध विषयांवर प्रात्यक्षिके करण्याचीही संधी मिळाली.

आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबरच अद्ययावत होण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरेल. कार्यशाळेतील ज्ञानाचा भविष्यात खूप उपयोग होईल असा विश्वास सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड अशा नामांकित संस्था व विद्यापीठे यांच्या सामंजस करारामुळे इमर्जिंग टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना अवगत करणे शक्य होत आहे, असे मत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button