वारकऱ्यांच्या सेवेकरिता कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वैद्यकीय पथकाचे देहूकडे प्रस्थान
मोफत तपासणी व औषधोपचार

वारकऱ्यांच्या सेवेकरिता कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वैद्यकीय पथकाचे देहूकडे प्रस्थान
मोफत तपासणी व औषधोपचार
बारामती वार्तापत्र
बारामती येथील कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठान च्या वतीने जनसेवा हिच ईश्वरसेवा या उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दवाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन देण्यासाठी वैद्यकीय पथक देहूकडे रवाना झाले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी दिली आहे.
कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठानचे वारकरी सेवेचे हे 25 वे वर्ष असुन संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांच्या वैद्यकिय सेवेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत.
देहू ते पंढरपूर मार्गावर या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असुन यावर्षी रुग्णवाहिका सेवा ही पुरविण्यात येणार आहे.त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्यां संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे.
या जनसेवेच्या उपक्रमात दानशूर व्यक्तिनी सहभागी होऊन जनसेवेच्या उपक्रमास मदत करणाऱ्याचे डॉ भिसे यांनी आभार व्यक्त केले. या उपक्रमातील पथकात डॉ.अप्पा आटोळे व डॉ.योगेश पाटील (लासुर्णे) राजेंद्र गायकवाड हे मदतनीस सहभागी आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी दिली आहे.