माळेगाव बु

अजित पवारांचं आव्हान अन् रंजनकुमार तावरेंनी जाहीर केलं चेअरमनपदाचं नाव, चंद्रराव तावरेंच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

सहकार चळवळीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी योगदान दिले.

अजित पवारांचं आव्हान अन् रंजनकुमार तावरेंनी जाहीर केलं चेअरमनपदाचं नाव, चंद्रराव तावरेंच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

सहकार चळवळीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी योगदान दिले.

माळेगाव : प्रतिनिधी

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधातील पॅनलने चेअरमनचं नाव जाहीर करण्याचे आव्हान दिले होते.

सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या सांगता सभेत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचे भाषण सुरू असतानाच रंजनकुमार तावरे यांनी अध्यक्षपदासाठी चंद्रराव तावरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जिनके पास गन्ना है उनके पास अण्णा है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

माळेगाव येथे आज सहकार बचाव शेतकरी पॅनलची सांगता सभा पार पडली. या सभेत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी अजित पवारांच्या कारभारावर परखड भाष्य केले. प्रचारादरम्यान, अजित पवारांनी विरोधातील पॅनल चेअरमनपदाचे नाव जाहीर करत नाही असे म्हणत त्यांनी चेअरमनपदाचे नाव जाहीर करण्याचे खुले आव्हान दिले होते.

हे आव्हान सहकार बचाव शेतकरी पॅनलने स्वीकारले असून चेअरमनपदासाठी चंद्रराव तावरे यांचे नाव जाहीर करत असल्याचे रंजनकुमार तावरे यांनी सांगितले.
सहकार चळवळीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी योगदान दिले. त्यांच्याच विचारांवर चालणारे चंद्रराव अण्णा आमचे चेअरमन असतील असे रंजनकुमार तावरे यांनी यावेळी जाहिर केले.
यावेळी चंद्रराव तावरेंच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जिसके पास गन्ना है उसके पास अण्णा है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. चंद्रराव तावरे यांना सहकारी साखर उद्योगाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आजपर्यंत त्यांनी सहकारासाठी योगदान दिले असल्यामुळे हा निर्णय आम्हाला आनंद देणारा आणि आमच्या प्रपंचासाठी फायदेशीर ठरेल अशी प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर काही कार्यकर्त्यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले.

Related Articles

Back to top button