इंदापूर

अत्याधुनिक युगात माणुसकी जपणे महत्वाचे : दत्तात्रय भरणे

संकल्प ग्रुप च्या सामुदायिक सन्मान करण्यात आला.

अत्याधुनिक युगात माणुसकी जपणे महत्वाचे : दत्तात्रय भरणे

संकल्प ग्रुप च्या सामुदायिक सन्मान करण्यात आला.

बारामती वार्तापत्र

अत्याधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणुसकी जपणं महत्त्वाचे असते अजितराव चव्हाण यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचा लौकिक वाढवला व माणुसकी जपली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहाय्यक अधिकारी अजितराव चव्हाण यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव समारंभ वेळी दत्तात्रय भरणे बोलत होते.

याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष विश्वास देवकाते व प्रतापराव पाटील, अविनाश गोफने,भाऊसाहेब सपकळ, दिलीप ढवाण,काशिनाथ जळक,दत्तात्रय रणवरे ,अभिनेते डी. पी. दादा,अभिनेत्री जान्हवी किल्लेकर,सोनल नाईक व इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्तीत होते.

उत्कृष्ट व्यायामपट्टू,बँक अधिकारी व कुटूंबवत्सल म्हणून त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले आहे व त्यांचे सेवा निवृत्तीनंतर जीवन निरोगी जावो व समाजसेवक म्हणून ओळख निर्माण होणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

या प्रसंगी संकल्प ग्रुप च्या सामुदायिक सन्मान करण्यात आला. अभिनेते रामभाऊ जगताप यांनी चांडाळ चौकटीच्या करामती या वेब सिरीज मधील डायलॉग वर उपस्तितांचे मने जिंकली

विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व विविध संस्था, संघटना यांनी सत्कार केला.

सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले उपस्तितांचे स्वागत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले तर आभार अभिनेते वैभव चव्हाण यांनी मानले .

Related Articles

Back to top button