
जनहित प्रतिष्ठान विद्यालय कबड्डी स्पर्धेत उपविजयी
तालुक्यातून २९ संघांनी सहभाग घेतला होता.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वर या ठिकाणी आंतरशालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या यामध्ये संपूर्ण बारामती तालुक्यातून २९ संघांनी सहभाग घेतला होता. यात जनहित प्रतिष्ठान प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटाच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
यामध्ये समिधा थोरात, मानसी जगदाळे, विराग्नी गायकवाड, स्वरांजली पवार, युगंधरा जाधव, सौम्या जाधव, वैष्णवी चोपडे, आराध्या कळसकर, मधुरा झगडे, इशिता झगडे, माही नाळे व सई भगत या खेळाडूंनी उत्तम खेळ करत हा विजय मिळवला. या खेळाडूंना NIS कोच क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे व शिक्षक श्री. अजिंक्य साळी यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.