स्थानिक

सात दिवसांत वाहने सोडवा; अन्यथा जाहीर लिलाव

मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया २३ सप्टेंबर २०२५

सात दिवसांत वाहने सोडवा; अन्यथा जाहीर लिलाव

मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया २३ सप्टेंबर २०२५

बारामती वार्तापत्र

बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यान्वये अटकावून ठेवलेली वाहने येत्या सात दिवसांत ताब्यातून सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थकीत कराच्या वसुलीसाठी संबंधित वाहन मालकांना कर व दंड भरण्याबाबत तीन वेळा नोटिसा बजावल्या आहेत. मात्र अद्याप अनेकांनी कर व दंडाचा भरणा केलेला नाही. अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून, त्यापैकी १६ वाहनांचे मालक अथवा ताबेदारांनी कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर वाहन सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

निर्धारित मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया २३ सप्टेंबर २०२५ रोजी https://www.mstcecommerce.com/ या संकेतस्थळावर राबविण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D