आपला जिल्हा

बारामती कॅटल फिडस् प्रा.लि.कडून माळेगाव काॅलनी शाळेस शालेय साहित्य वाटप

5  वी ते 7 वी च्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

बारामती कॅटल फिडस् प्रा.लि.कडून माळेगाव काॅलनी शाळेस शालेय साहित्य वाटप

5  वी ते 7 वी च्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

बारामती वार्तापत्र 

बारामती कॅटल फिडस् प्रा.लि.बारामती CSR फंडांतर्गत समाजोपयोगी शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनींना साहित्य वाटप उपक्रम जि.प.प्राथ.शाळा माळेगाव काॅलनी येथे राबविण्यात आला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कंपनीच्या CSR फंडाचा वापर समाजोपयोगी उपक्रमांसाठी व्हावा या दृष्टीने बारामती कॅटल फिडस् प्रा.लि.यांनी माळेगाव काॅलनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप व 5  वी ते 7 वी च्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.बारामती विभागाचे मार्केटिंग ऑफीसर श्री.मच्छिंद्र मिसाळ यांनी कंपनीबद्दल थोडक्यात माहिती व मार्गदर्शन दिले.यावेळी श्री.गौरव शहा,श्री.अनिल कदम,श्री.मच्छिंद्र मिसाळ,श्री.मारुती सुर्वे(सेल्स् ऑफिसर बारामती), श्री.कृष्णमुर्ती जगताप (अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समिती),श्री.श्रीकांत पवार उपस्थित होते.या समाजोपयोगी शालेय साहित्य व सॅनिटरी नॅपकिन वाटप उपक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब जगताप आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी केले.

Back to top button