इंदापूर

मुबारक मुलाणी यांचे निधन.

रविवार दि.२८ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

मुबारक मुलाणी यांचे निधन.

इंदापूर:- प्रतिनिधी
निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील मुबारक पापाभाई मुलाणी (वय ७१) यांचे रविवार दि.२८ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर अकलूज ( जि. सोलापूर ) येथे खाजगी रुग्णालयात गेले पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. दि.२८ जून रोजी सकाळी ११ वाजता उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली ( विवाहित ) सुना, नातवंडे असा परिवार आहे. झी २४ तास चे बारामती विभागाचे प्रतिनिधी तसेच दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी जावेद मुलाणी यांचे ते वडील होत. निमगाव केतकी येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर दफनविधी करण्यात आला.

त्यांचा मुस्लिम समाजासह इतर क्षेत्रात मोलाचा सहभाग असल्याने त्यांच्या निधनाने निमगाव केतकी परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, राजवर्धन पाटील , देवराज जाधव, नानासाहेब शेंडे यांनी मुलाणी परिवाराचे सांतवन केले.

Related Articles

Back to top button