आपला जिल्हा

बारामती वाहतूक शाखेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त मनुष्यबळ१० लोकांची नियुक्ती; वाहतूक नियमांचे होणार काटेकोर पालन

नागरिकांनी या सुरक्षा रक्षकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

बारामती वाहतूक शाखेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त मनुष्यबळ १० लोकांची नियुक्ती; वाहतूक नियमांचे होणार काटेकोर पालन

नागरिकांनी या सुरक्षा रक्षकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिरिक्त वाहतूक आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेता, वाहतूक शाखेवरील ताण कमी करण्यासाठी बारामती वाहतूक शाखेच्या विनंतीवरून बारामती नगरपरिषदेकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या अंतर्गत १० सुरक्षा रक्षक जवानांची नियुक्ती बारामती वाहतूक शाखेत करण्यात आली असून, यामुळे शहरातील वाहतूक शिस्त अधिक प्रभावीपणे राखली जाणार आहे.

बारामती पोलिस वाहतूक शाखेकडून काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. शहरातील यासाठी उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेतला होता.

मुख्य बाजारपेठा, बसस्थानक परिसर, सर्व चौक अशा अनेक ठिकाणी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण जाणवत असल्याने हे मनुष्यबळ अत्यावश्यक झाले होते.नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत १० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असून हे जवान शहरातील वाहतूक नियमनाचे काम पाहतील.

तसेच नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करतील. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणाले,’सणासुदीच्या दिवसांत गर्दी वाढते. त्यामुळे या अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने वाहतूक नियंत्रण अधिक सोपे होईल.

नागरिकांनी या सुरक्षा रक्षकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.’ नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी होण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरणार आहे.

Back to top button