क्रीडा

खेलो इंडिया उमन्स लीग स्पर्धेत बारामतीच्या खेळाडूंचे यश

१२ खेळाडूंची निवड

खेलो इंडिया उमन्स लीग स्पर्धेत बारामतीच्या खेळाडूंचे यश

१२ खेळाडूंची निवड

बारामती वार्तापत्र 

अहिल्यानगर या ठिकाणी खेलो इंडिया उमन्स लीग पार पढल्या या स्पर्धेत महाराष्ट्र मधील २०० खेळाडूंनी हभाग नोंदवीला होता.

बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या १२ खेळाडूंची निवड या खेलो इंडिया स्पर्धेत झालेली होती. या स्पर्धेत ओवी ढाले, आदिश्री शितोळे, प्रियश्री शितोळे, आराध्या शितोळे यांनी गोल्ड मेडल मिळवले तसेच लावण्या उमाप व यशस्वी लोखंडे या मुलींनी सिल्वर मेडल आणि तन्वी ढमे यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवून बारामतीचे व संघचे नाव महाराष्ट्र भर गाजवले तसेंच या संघमध्ये प्रगती चांदगुडे, श्राव्या सोमवंशी, ऋतुजा वरपे,चैत्राली भगत,आराध्या ढमे इत्यादी खेळाडूनि उत्कृष्ठ कामगिरी केली.

या सर्व खेळाडूंनी बारामती मधील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये मास्टर साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते.

खेलो इंडिया स्पर्धेत रेफरी म्हणून आदित्य आटोळे रुद्र नाळे यांनी काम पाहिले तसेंच या खेळाडूंना कोचं म्हणून ऋतुराज घुले यांनी काम पाहिले.

Back to top button