विद्या प्रतिष्ठान बारामती येथे “एआय तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न”
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्या प्रतिष्ठान बारामती येथे “एआय तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न”
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बारामती वार्तापत्र
“एआयची मूलभूत तत्त्वे” या विषयावरील एक आठवड्याचे कौशल्य विकास प्रशिक्षण विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स येथे यशस्वीरित्या पार पडले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे, उद्योगाभिमुख डिझाइन कार्यपद्धती (वर्कफ्लोज) तसेच डेटा विश्लेषण, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग या क्षेत्रांतील संकल्पना व एआय साधनांचा प्रभावी वापर यांची ओळख करून देणे हा होता.
या प्रशिक्षण सत्रांचे मार्गदर्शन एम.आय.टी.यू. स्किलॉलॉजीज, पुणे येथील तांत्रिक अधिकारी श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांनी उद्योगाभिमुख दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाचा हँड्स-ऑन अनुभव मिळाला. विविध वास्तविक जीवनातील समस्यांवर आधारित प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवर विद्यार्थ्यांनी एआय साधनांचा वापर करून डेटा विश्लेषणावर आधारित प्रकल्प विकसित करून सादर केले.
अशा शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनासाठी विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापन समितीने दिलेल्या सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.
या उपक्रमासाठी कौशल्य विकास प्रमुख डॉ. प्रदीप पैठणे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणाचे समन्वयन सौ. रोहिणी नाईक आणि श्री चिन्मय गायकवाड यांनी केले.






