स्थानिक

बारामतीत खाजगी गाडीवर सरकारी दिवा?अधिकारी फॅमिली टूरवर आल्याची चर्चा

पोलिस किंवा प्रशासनाने चौकशी करून खरे वास्तव समोर आणावे

बारामतीत खाजगी गाडीवर सरकारी दिवा?अधिकारी फॅमिली टूरवर आल्याची चर्चा

पोलिस किंवा प्रशासनाने चौकशी करून खरे वास्तव समोर आणावे

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात सरकारी दिवा लावलेल्या खाजगी गाडीचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मारुती कंपनीची एरिटिगा ही गाडी शहरातील बाजारपेठ परिसरात येऊन उभी असल्याचे दिसून आले.

या गाडीवर सरकारी दिवा लावलेला होता. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी कुटुंबासह खरेदीसाठी आल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी नो पार्किंगच्या ठिकाणी उभी करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी दिवा असलेली गाडी असल्यामुळे सुरुवातीला ती शासकीय वाहन असल्याचा समज झाला. मात्र नंतर ती खाजगी वाहन असल्याची चर्चा सुरू झाली.

यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित गाडी अधिकाऱ्याच्या नावावर आहे का? ती शासकीय वाहन नसताना त्यावर सरकारी दिवा कसा लावण्यात आला? अशा प्रकारे खाजगी गाडीवर सरकारी दिवा लावून शहरात फिरणे कायदेशीर आहे की बेकायदेशीर? याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

स्थानिकांच्या मते,शहरात काही अधिकारी खाजगी वाहनांवर सरकारी दिवे लावून फिरत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही ऐकू येत होत्या.मात्र अशा प्रकारांवर ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार-रविवारी बारामतीत असायचे. त्यामुळे अधिकारी वर्गात एक प्रकारची शिस्त आणि भीती होती,अशी चर्चा स्थानिकांमध्ये होते.त्यांच्या निधनानंतर शहरातील प्रशासनात शिस्त कमी झाल्याचे काही नागरिकांचे मत आहे.

या प्रकरणी पोलिस किंवा प्रशासनाने चौकशी करून खरे वास्तव समोर आणावे आणि नियमभंग झाला असल्यास संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button