दौंड

दौंड तालुक्यातील पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग;ट्रक जळून खाक

अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

दौंड तालुक्यातील पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग;ट्रक जळून खाक

अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

दौंड; प्रतिनिधि

दौंड तालुक्यातील पाटस येथील एम.आर.एन. भीमा सहकारी साखर कारखान्यात सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बगॅसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णतः जळून खाक झाला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या दक्षिणेकडील बाजूस मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या बगॅसला अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. बगॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने वेगाने पसरत परिसर व्यापला.

घटनास्थळी उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि काही वेळातच पूर्णतः जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी होती की कारखाना परिसरासह आजूबाजूच्या वाड्यांमध्ये धूर व उष्णतेच्या लाटा जाणवत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, कारखान्यात तत्काळ अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नसल्याने आग विझविण्यास विलंब झाला. कुरकुंभ एमआयडीसी येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने मोठे रौद्ररूप धारण केले होते. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

कारखान्याच्या संरक्षण भिंतीलगत मोटेवाड्याकडे जाणारा रस्ता, शेती क्षेत्र तसेच जिल्हा परिषद साखर शाळा परिसर असल्याने संभाव्य धोका निर्माण झाला होता. आग लागल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. या आगीत ट्रकसह बगॅसचा मोठा साठा जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

Back to top button