क्राईम रिपोर्ट

बारामतीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई; मात्र मटका-जुगारावर प्रश्नचिन्ह कायम

काही नागरिकांनी तर “धाडसी अधिकारी पुढे येऊन या व्यवसायांवरही कारवाई करतील का?”

बारामतीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई; मात्र मटका-जुगारावर प्रश्नचिन्ह कायम

काही नागरिकांनी तर “धाडसी अधिकारी पुढे येऊन या व्यवसायांवरही कारवाई करतील का?”

बारामती वार्तापत्र 

शहरात वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून अलीकडेच कारवाई करण्यात आली आहे. शहरालगत असलेल्या गुणवडी गावात पोलिसांनी धाड टाकत अवैध दारू व्यवसायावर कारवाई केली. या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ही कारवाई होत असताना पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असले, तरी शहरातील इतर बेकायदेशीर व्यवसायांबाबत मात्र प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः मटका आणि जुगार व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही भागांमध्ये मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असून त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे “दारूवर कारवाई होते, पण मटका-जुगारावर का नाही?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यामुळे पोलिसांच्या कारवाईत सातत्य आणि सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर समान कडक भूमिका अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. काही नागरिकांनी तर “धाडसी अधिकारी पुढे येऊन या व्यवसायांवरही कारवाई करतील का?” असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे काही प्रमाणात अवैध धंद्यांना आळा बसत असल्याचे दिसत असले, तरी मटका आणि जुगारासारख्या व्यवसायांवर ठोस आणि मोठ्या प्रमाणावर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Back to top button