स्थानिक

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार

बारामती वार्तापत्र

मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.
मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये.

मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, तसेच मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा भाग व्हावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

Back to top button