स्थानिक

बारामतीत महिलांना जाळ्यात अोढण्याचा नवा फंडा?

बारामतीत महिलांचे गेट टू गेदर, पार्टी,व्हॉट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून भलतेच प्रकार 

बारामतीत महिलांना जाळ्यात अोढण्याचा नवा फंडा?

बारामतीत महिलांचे गेट टू गेदर, पार्टी,व्हॉट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून भलतेच प्रकार
बारामती वार्तापत्र
बारामतीत महिलांना जाळ्यात अोढत त्यांना उच्चभ्रू, प्रतिष्ठीत आणि भरपूर माया असणाऱया पुरुषांपर्यंत पोहोचविण्याचा नवाच फंडा सध्या तेजीत आला आहे. बारामतीत महिलांचे एकत्र येऊन पार्टी किंवा गेट टू गेदरच्या सुरू असलेल्या काही संशयास्पद हालचालींमुळे शहरात सध्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियाचा आधार घेत हे खेळ सुरु आहेत.
बारामती शहरात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून काही महिला एकत्र येत असल्याचे समोर आले असून, या भेटींचे स्वरूप केवळ मैत्रीपूर्ण किंवा सहलीपुरते मर्यादित नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला स्वतंत्रपणे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून एकत्र फिरायला जाण्याचे, गेट-टुगेदर आयोजित करण्याचे नियोजन करतात. सुरुवातीला हे कार्यक्रम साधे सामाजिक किंवा मैत्रीपूर्ण स्वरूपाचे वाटत असले, तरी नंतर या पार्ट्यांमध्ये काही भलतेच प्रकार घडत असल्याच्या चर्चा पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांमध्ये केवळ महिलाच नव्हे तर काही पुरुषांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामतीत या प्रकाराबाबत कुजबुज सुरू असून, या प्रकरणात काही उच्चभ्रू कुटुंबांतील महिला व पुरुष सहभागी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या घडामोडींमुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील एका ग्रूपबाबत असा प्रकार नुकताच घडला. त्यात अनेक नामांकित आणि उच्चभ्रू पुरुषांची नावे समोर आली. या ग्रूपमध्ये लिडर असणाऱया एका महिलेने दुसऱया महिलेवर जाळे टाकले. एका प्रतिष्ठीताला तु भेट, अोळख वाढव, तुझ्यासाठी तो योग्य आहे, सर्व सुखे दाराशी येतील असे स्वप्न दाखवले. त्यासाठी महाबळेश्वर व अन्य ठिकाणी फिरायला जाण्याचेही नियोजन झाले. सुदैवाने ही महिला अशा अमिषाला बधली नाही. विशेष म्हणजे याची माहिती बाहेर आल्यानंतर हे प्रकरण मोठी तडजोड करून मिटवूनही टाकण्यात आले.
स्वतःला प्रतिष्ठीत समजणाऱया एका व्यक्तिची मैत्रिणच अशा पार्टीला गेली होती. त्याला ही बाब कळाल्यावर त्याने रागातून भांडाफोड केल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे.
या प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून,जर कोणतेही गैरप्रकार घडत असतील तर त्याची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे,अशी मागणी काही नागरिकांकडून केली जात आहे.
Back to top button